shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा मच्छीमार सह.संघाचे संस्थापक चेअरमन शरद सबाजी बाचकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड:

महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष हा अत्यंत झपाट्याने वाढत चाललेला पक्ष आहे आणि या पक्षाचे ध्येय धोरण प्रस्तापिताना घराणेशाहीला विस्थापित करून सर्व सामान्य जानेतेची सेवा करणारांना सत्तेत बसवण्यासाठी पक्ष आहे या पक्षाचा जो कार्यकर्ता असतो तोच या पक्षाचा नेता बनतो असे या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांची शिकवण प्रत्येक कार्यकर्त्याला आहे.

 सर्व समाजाला बरोबर घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पक्षाचे काम पसरवलेले आहे आणि यामध्ये सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे असे म्हणजे शरदभाऊ बाचकर सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आत्तापर्यंत त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वावरथ जांभळी गावात पक्षाचा सामान्य कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख, अहमदनगर जिल्हाध्यक्ष,उत्तर महाराष्ट्र प्रभारी, ते आता नुकतीच त्यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड असा राजकीय प्रवास अत्यंत मेहनती जिद्द चिकाटी च्या जोरावर या क्षेत्रात काम करत आहेत उदयोग व्यवसाय मध्येही मत्स्यव्यवसाय सुरु करून अनेकांना आपल्या बरोबर मार्गदर्शन केले एक नव्हे तर अनेक कुटुंबाचे आधार बनले आहे गोरगरिबांना मदत करणे, कुठलेही सामाजिक धार्मिक कार्यात हिरारीने सहभाग घेणारे व्यक्तीमत्व त्यांनी दिलेला रोजगार प्रत्येक कुटुंबांचं भविष्य बदलून टाकणारा आहे. 

एक सामान्य कार्यकर्ता गरिबीतून वर येतो आणि राजकीय क्षेत्रा बरोबर मत्स्य व्यवसाय उद्योजक बनतो जिल्हा सहकारी मच्छिमार संघ स्थापण करतो म्हणजे खूप कष्ट करून मिळवलेलं फळ होय, अशी माणसे समाजामध्ये कमी जन्माला येतात आणि म्हणून शरदभाऊ बाचकर यांचे कार्य समाजामध्ये महान आहे आणि एक राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खूप दिवसापासून जबाबदारी जपली आहे आणि म्हणून त्यांच्यावर महादेव जानकर साहेब यांनी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ही जबाबदारी दिली आहे ति जबाबदारी ते नक्कीच पार पडतील ही सर्वांना आशा आहे.

काल श्रीरामपूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली  शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक पार पडली यामध्ये प्रदेशाध्यक्ष व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या हस्ते त्यांची उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी पक्षासाठी तळागळातील कार्यकर्ता निर्माण करील व पक्षासाठी अहोरात्र प्रयत्न करील माझ्यावर दिलेली जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पार पाडील व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांचे नाव व पक्षाचे नाव मोठे करील .

यावेळी उपस्थिताचे स्वागत व सत्कार जिल्हाचे वतीने जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी केले सदर बैठकीला प्रदेश सचिव रविंद्र कोठारी,राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ प्रल्हाद पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अँड संजय माने,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, रभाजी खेमनर,दत्तात्रय कचरे, सीताराम वनवे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुवर्णा ज-हाड,रेखा नरवडे,सविता दिघे,बाबुराव पवार,प्रा.संतोष काळे, गोरख होडगर ,नंदकुमार खेमनर, भगवान करवर,राजेंद्र लावरे,माणिकराव शिंदे, शिवाजी खेडेकर, संदीप कांदळकर,सचिन लाटे,मालुजी तिखुळे,अमोल तमनर,कपिल लाटे,नानासाहेब जगताप विलास सैंदोरे, सोपान तांबडे रविंद्र जाधव अदी मोठ्या संखेने राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शरदभाऊ बाचकर यांचा सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे आभार डॉ सुनील चिंधे यांनी मानले.
close