विशाल धनवडे मृत्यू प्रकरण..!!
जालना । प्रतिनिधी:-
दिनांक 9 मे रोजी वाटुर फाटा येथील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात विशाल धनवडे वय १९ वर्ष याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या मृत्यू प्रकरणी त्याची फिर्याद देणार्या भावाचे म्हणणे योग्य रीतीने ऐकून न घेता पोलिस यंत्रणांनी आरोपींंना मदत करत वाटुर फाटा येथील विशाल धनवडे याने आत्महत्या केल्याचे भासवत सदर आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गावातील कैलास माने यांच्या सोबत विशाल धनवडे याचा नेहमी वाद होत होता आणि विशाल धनवडे याला कैलास माने यांने यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. विशाल धनवडे याने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी सातत्याने केला आहे. कारण विशाल धनवडे हा उत्तम प्रकारचा पोहणारा होता.
जुन्या भांडणाच्या वादावरून त्याला गावातील कैलास माने यांनी मोटरसायकलवर बसून घेऊन जाऊन त्याचा खून करून शेततळ्यात टाकले असल्याचा आरोप त्यांचे वडील नामें कल्याण धनवडे यांनी केला असून आरोपींनी मात्र पोलिस यंत्रणांना आर्थिक रसद पुरवून आत्महत्या केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो गुन्हा कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दि.७ जून २०२२रोजी वडार पॅंथर चे अध्यक्ष दयानंद इरकल यांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे.या निवेदनाची दखल न घेतल्यास राज्यभर वडार समाज संघटना तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देखील त्यांनी शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले आहे.

