shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

म्हातारीच्या "चहा नास्ताच्या" दुकाण दुरुस्तीला बल्हारपूरच्या विजय - नरेशची आडकाठी !महिलेचे न.प.व पोलिस स्टेशनला निवेदन!

    

चंद्रपूर -◼️किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी ◼️
गेल्या अनेक वर्षांपासून छोटासा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्ध महिलेने जिर्ण झालेल्या दुकाणाची दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न केला परंतु या दुरुस्तीसाठी  बल्हारपूर नगरीतील विजय पटेल व नरेश पटेल हे दोघे आपणांस आडकाठी देत असल्याचे एक लेखी निवेदन आज शुक्रवार दि.३जूनला स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना दिले आहे.या वृद्ध महिलेचे नांव छबूताई नथ्थू गजबे असे आहे.हायवे रोड लगत साई बाबा वार्ड येथे नझुलच्या जागेवर मागिल ६०वर्षांपासून नथ्थू गजबे यांचे पान टपरीचे एक छोटे दुकाण आहे.दरम्यान सन २०००मध्ये नत्थूजी गजबे यांचे आजाराने दुखःद निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी नामे छबूताई गजबे यांनी त्या ठिकाणी चहा नास्त्याचे दुकाण थाटले .आज त्या दुकाणाला २२वर्ष झाले सध्या छबूताई हे दुकाण सांभाळीत आहे.पावसाळ्यात ग्राहकांना त्रास होवू नये म्हणून त्यांनी सदरहू दुकाण दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण दुकाण शेजारी असलेले विजय पटेल व नरेश पटेल हे दोघे दुकाण दुरूस्तीला अडथळा देत असल्याचे सादर केलेल्या निवेदनात म्हटले‌ आहे.याच दुकानाच्या भरोश्यावर आपला उदरनिर्वाह चालत असुन या शिवाय जगण्यास आपणांस दुसरे साधन नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे.





वारंवार या वृध्द महिलेने नगर परिषदेला जागेचा कर लावण्यासाठी विनंती अर्ज‌ केले पण त्या कडे संबंधित विभागाने लक्ष पुरविले नाही. उपरोक्त जागेवर ब-याच वर्षांपासून सदरहु महिलेचा कब्जा आहे.
close