स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे विचार आपण अंगीकारून समाजाला एकसंघ करूया - शेखर पानसरे.
निमसाखर ( पानसरे मळा ) येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी.
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर ( पानसरे मळा ) येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा मंदिर पानसरे मळा या ठिकाणी साजरी करण्यात आली.
यावेळी ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब पानसरे , निमसाखर विकास सेवा सोसायटीचे संचालक सतीश पानसरे, निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य व वंजारी सेवा संघ युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पै. शेखर पानसरे , पोपट पानसरे, सोमनाथ चौधरी, नवनाथ पानसरे, सोनू चौधरी, सागर पानसरे, अविनाश चौधरी यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. शेखर पानसरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण मुंडे साहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष करून समाजाला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. समाज त्यांच्या ऋणात कायम आहे तसेच साहेबांना आदरांजली अर्पण करताना साहेबांचे विचार आपण अंगीकारून समाजाला एकसंघ करूया व समाज बांधवासाठीच्या अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

