shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचा बेकायदेशीरपणे फेरफार , संबंधितावर कायदेशीर कारवाई करा - चंद्रपूर आपची मागणी !


◼️कारवाई न केल्यास आंदोलन छेडू -राजु कुडेंचा इशारा 

चंद्रपूर-◼️ किरण घाटे जि.प्र.◼️

आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्षा श्रीमती एडवोकेट सुनिताताई पाटील यांच्याकडे नागभीड तालुक्याच्या अकापूर येथील शेतकऱ्यांची शेत जमीन बेकायदेशीरपणे फेरफार केल्याची तक्रार आली होती. त्या संदर्भात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना आदिवासी समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांची शेती बेकायदेशीरपणे हडप केली आहे अश्या व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तथा शेतकऱ्यांची जमीनी परत मिळवुन द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली होती. परंतु या बाबतीत अद्याप चौकशी होवूनही त्या आदिवासी शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही.





येत्या 20 दिवसात या संदर्भात करवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी आदिवासी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारेल. असा इशारा नुकताच आपचे राजु कुडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातुन दिला आहे. तदंपूर्वी जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात निवेदन देताना आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे ,शहर सचिव राजू भाऊ कुडे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, युथ विंग उपाध्यक्ष डॉ .अहेर, महिला उपाध्यक्ष जस्मीन शेख, महिला सचिव आरती  आगलावे,कुशल शर्मा,पवन वाघमारे, लक्ष्मन पाटील,  वंदना गवळी आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

close