अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने दिले निवेदन
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २५ / अहमदनगर जिल्ह्यातील सुरू असलेल्या महा ई सेवा केंद्र म्हणजेच सेतु मध्ये नागरिकांना प्रमाणपत्र काढण्यासाठी व इतर दस्तावेज काढणे कामी सेतू कार्यालयमार्फत मनमानी रक्कम आकारली जात आहे.
या कामाची कोणत्याही प्रकारची नागरिकांना पावती सेतुमधून दिली जात नाही. फक्त एका साध्या रजिस्टरवर अर्जदाराचे नाव नोंदणी केली जाते. सेतू कार्यालयमध्ये शासकीय प्रमाणपत्र व इतर कामाचे फलक लावण्यात आले आहे .पण कामाचे दर पत्रक का लावण्यात आले नाही ?याची प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र सेतूवर त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी भैय्या खरारे यांचे मार्फत श्रीमती. उर्मिला पाटील उपजिल्हाधिकारी (महसूल) यांना देण्यात आले व यावर चर्चाही करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे ,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव दिपक नकवाल, कुणाल बैद,विक्रम चोहान (सर), जिल्हा कार्याध्यक्ष शुभम टाक, प्रवीण बग्गन, अतुल अपील,पवन सेवक आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

