shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा


करमाळा भाजपा अँक्शन मोड मध्ये

प्रतिनिधी : संजय वायकर

करमाळा : २६ /  माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून सहपत्नी करमाळा गावचे अराध्य दैवत श्री कमलाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर जगदंबा ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार येण्याची आशा व्यक्त केली.

या वेळी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि शहरातील अडी अडचणी जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.यानंतर त्यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकी बद्दल सविस्तर चर्चा केली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शाम सिंधी,तालुका उपाध्यक्ष रामा ढाने,मोहन शिंदे,महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव,व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर,काका सरडे, बाळासाहेब कुंभार, प्रकाश क्षिरसागर,अमोल पवार,संजय जमदाडे,विशाल परदेशी,जितेश कांबळे सर,विनोद महानवर आदी उपस्थित होते.
close