◼️जेष्ठ विचारवंत व लेखक प्रा.अशोक राणा यांचे होणार व्याख्यान !
चंद्रपूर◼️ किरण घाटे◼️
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट व शिवराज्याभिषेक आयोजन समितीच्या वतीने आज दि. ६ जूनला संध्याकाळी ६वाजता चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आयोजक समितीने या प्रतिनिधीस काल दिली. या आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत व प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. अशोक राणा हे उपस्थित राहणार असुन शिवराज्याभिषेकाच्या औचीत्यावर ते व्याख्यान देणार आहे. प्रा .राणा भारतातील संत परंपरा व शिवराज्याचा उदय यावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहे.
वर्तमान काळात धर्माचे नावावर देशातील नागरिकांना आपसामध्ये लढवाण्याचे व भिडविण्याचे सत्ताधारी पक्षाचे जे प्रयत्न सुरु आहे तदवतचं भारतीय संविधानाच्या धर्मनिरापेक्षता आणि बंधुता या तत्वाला मातीमोल करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्या कडे बघता दि .६ जूनच्या व्याख्याना निमित्ताने चंद्रपूरकरांना त्यांचे विचार ऐकण्याची संधी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंटने उपलब्ध करून दिली आहे.या व्याख्यानाचा लाभ जनतेंनी घ्यावा असे आवाहन सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी केले आहे.
◼️विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा गौरव!सुपरिचित पत्रकार लिमेश जंगम यांचा ही होणार मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान◼️शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवराज्यभिषेक सोहळा आयोजन समितीच्या वतीने युपीएससी, न्यायालय, बांबू कला, पत्रकारिता, पर्यावरण आणि कोविड बिमारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दोन वर्ष पर्यंत शासकीय रुग्णालयात कोविड तज्ज्ञ म्हणून सेवा देणारे डॉक्टर्स व नर्स यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
◼️यात नुकतीच जजची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकिशा पठाण व ललिता टाकभैरे, UPSC 2021 मध्ये उत्तीर्ण झालेले आदित्य जिवणे, अभिजित मानकर व अंशुमन यादव, बांबू कलेच्या उल्लेखनीय कार्यासाठी मीनाक्षी मुकेश वाळके, डोनेट ऍप तयार करून असंख्य लोकांना मदत उपलब्ध करून देणारे सारंग बोबडे, कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे, सरकारी दवाखाण्याचे डॉ .बंडू रामटेके, डॉ. सचिन दगडी, डॉ.गणेश कौरासे, डॉ. सचिन बिलावणे, डॉ सौरभ राजूरकर, डॉ. आशिष पोडे, कोरपनाचे येरमे दाम्पत्य, सिस्टर किरण वैरागडे, कोविड रुग्णासाठी आपली संस्था व मंगल कार्यालय उपलब्ध करून देणारे इन्स्पायर चंद्रपूरचे संचालक प्रा .विजय बदखल , भद्रावातीचे रवींद्र शिंदे,पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे तसेच शोध पत्रकारितेत विशेष रुची ठेवणारे पत्रकार लिमेश जंगम, पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करणारे प्रा. डॉ .योगेश दुधपचारे , प्रा. सुरेश चोपने आदींचा याप्रसंगी मानचिन्ह देऊन सत्कार
करण्यात येणार आहे. चंद्रपूरकर जनतेने या कर्तृत्वांचा गौरव करण्यासाठी व प्रा .अशोक राणा यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजन समिती व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंटच्या वतीने करण्यात आले आहे.

