मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस मनसे इंदापूर शाखेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा.
वनपरिक्षेत्रातील प्राण्यांचे पिण्याच्या पाण्याचे पाणवठे भरून वन्य प्राण्यांची रखरखत्या उन्हाळ्यात केली पाण्याची सोय.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे दीर्घ आयुष्यासाठी निमगाव केतकी येथील ग्रामदैवत केतकेश्वर महादेव मंदिरात विधीवत रूद्राभिषेक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:दि १४ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे इंदापूर शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत विविध समाजोपयोगी उपक्रम घेवून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
राज ठाकरे यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे , त्यांची होणारी शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इंदापूर तालुका यांच्या वतीने सकाळी ९.३० वा. निमगाव केतकीचे ग्रामदैवत केतकेश्वर महादेव मंदिरात विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, त्यांनी पाहिलेलं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न लवकर साकार व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात आली.
त्याचप्रमाणे पाऊस लांबल्याने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी वनविभागाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडून वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.
यावेळी मनसेचे राजू भोंग, फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे ॲड सचिन राऊत , चैतन्य कदम , मंगेश भोंग, तानाजी जगताप, शिवा भोंग, अंबादास जगताप, गणेश भोंग उपस्थित होते.

