निर- निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल चा १३-० ने विजय.
इंदापूर प्रतिनिधी:निर- निमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित निर निमगावचे २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया १७ जून रोजी संपन्न झाली व त्याच दिवशी मतमोजणी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल ने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रचारप्रमुख दत्तामामा घोगरे यांच्या नेतृत्वाखाली१३ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवून विजय झाला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे:
सर्वसाधारण मतदारसंघातून :
१)ज्ञानदेव विठ्ठल गरगडे
२) रणजीत दत्तात्रय घोगरे
३)आबा दादा जाधव
४)चंद्रकांत रामचंद्र जाधव ५)देवराव जयसिंग जाधव ६)बाळू तुळशीराम जाधव ७)अण्णा कुमार पवार
८) वैजनाथ तुळशीराम साळुंके
महिला प्रतिनिधी
९) जयश्री विलास गरगडे
१०) चांगण जयश्री विलास
भटक्या विमुक्त जाती जमाती:
११)निलेश देविदास देवडे
अनुसूचित जाती जमाती:
१२)सागर महावीर खरात
इतर मागास वर्ग:
१३)जाफर शहाबुद्दिन मुलानी
सर्व विजय उमेदवार यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

