shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालवा लाभक्षेत्रात शेततळे आधारीत सुक्ष्म सिंचन प्रणाली काळाची गरज-प्रमुख संशोधक डॉ. आर. के. पांडा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
बुधवार दिनांक २१ जून २०२२

कालवा लाभक्षेत्रात शेततळे आधारीत सुक्ष्म सिंचन प्रणाली काळाची गरज-प्रमुख संशोधक डॉ. आर. के. पांडा..!!

राहुरी विद्यापीठ, : कालव्याच्या लाभक्षेत्रामधील विकासामुळे धोकादायक दुष्काळ टाळुन आर्थिक विकासाला गति मिळु शकते, तसेच कालव्याच्या विकासाद्वारे पावसावरील अवलंबित्व कमी करता येवू शकते. पाण्याची उत्पादकता सुधारण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे ही लाभक्षेत्रामधील वास्तविक परिस्थीतीनुसार वेगवेगळया भागासाठी वेगवेगळी आखावी लागतात. भुबनेश्वर येथील शेततळे आधारीत सुक्ष्म सिंचन प्रणाली पावसाळ्यानंतरच्या हंगामासाठी वरदान ठरलेली आहे. 
त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक परिस्थीती सुधारण्यास मदत होते. म्हणून कालवा लाभक्षेत्रात शेततळे आधारीत सुक्ष्म सिंचन प्रणाली काळाची गरज आहे असे प्रतिपादन भुबनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ वॉटर मॅनेजमेंटचे प्रमुख संशोधक डॉ. आर. के. पांडा यांनी केले.
       महात्मा फुले कृषि विद्यापीठातील हवामान अद्यायावत शेती व जलव्यवस्थानाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत कालवा लाभक्षेत्रामध्ये जलव्यवस्थापनाचे पर्याय या विषयावर भुबनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ वॉटर मॅनेजमेंटचे प्रमुख संशोधक डॉ. पांडा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ होते. यावेळी कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख आणि कास्ट प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, कास्ट प्रकल्पाचे प्रकल्प सह-समन्वयक डा.ॅ मुकुंद शिंदे, आणि मृदा व जलसंधारण विभागाचे प्रमुख आणि नोडल ऑफिसर डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सुनिल कदम आणि सचिन डिंगरे उपस्थित होते. 

 यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले कि स्वयंचलीत कालवा सिंचन प्रणालीमुळे पाण्याची बचत होऊन महाराष्ट्रातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येणे शक्य आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. सचिन नांदगुडे यांनी पाहुण्याचे स्वागत करुन ओळख करुन दिली. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल कृषि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद शिंदे तर सुत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन इंजि. दत्तात्रय पवार, इंजि. कल्पेश बोरसे आणि इंजि. अभिषेक दातिर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close