चंद्रपूर◼️किरण घाटे ◼️
साहेबराव नंदन लिखित गावगाडा ह्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच कुसुमाग्रज स्मारक स्वागत हॉल नाशिक येथे ॲड .संभाजी यशवंत पगारे उर्फ बापूसाहेब ह्यांच्या हस्ते व चंद्रकांतजी बागुल ह्यांच्या अध्यक्षते खाली पार पडला . ह्या प्रसंगी साहित्य क्षेत्रातील साहित्यिक कवी अजय बिरारी ॲड .सोमदत्त मुंजवाडकर , संगीता भामरे ,कु. स्वप्ना बोरसे तसेच सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व असलेले सर्व सगर समाज बांधव व मित्र परिवार बहुसंख्येंने उपस्थित होता . गावगाडा ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ विष्णू थोरे यांनी तयार केले आहे. डॉ . सुर्यभान सनांन्से, सुरेखा आहेर ' ललित साळवे ह्यांनी साहेबराव नंदन यांना या वेळी शुभेच्छा दिल्या .
तानाजी खोडे यांनी प्रस्तावना लिहीली आहे. तो काव्यसंग्रह ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक यांनी प्रकाशित केला आहे . सगरवंशिय जिरे माळी समाज ,सगररत्न परिवार व ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरहु सोहळा आयोजित करण्यात आला होता .या प्रसंगी साहेबराव नंदन व सरला नंदन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले ' तर प्रा . शांताराम गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ' प्रा . डी . टी . पाटील यांनी गावगाडा विषयी समालोचन केले . ज्ञानेश्वर घरटे 'व कमलाकर घरटे यांनी सुत्रसंच़ालन केले तर शेवटी ललितभाऊ साळवे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.कार्यक्रमाला अनेक साहित्यिक मंडळी उपस्थित होती.

.jpeg)

