चंद्रपूर-◼️किरण घाटे◼️
देशातील तरूण सैन्यात भरती होण्याकरीता वर्षांनुवर्षे तयारी करतो. कुठल्याही वशिल्याविना सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी - शेतमजुराच्या मुलाला रोजगार देणा-या या क्षेत्रात आता केवळ 4 वर्षांकरीता कंत्राटी पध्दतीप्रमाणे भरती करणारी अग्नीपथ योजना केंद्रातील भाजपचे मोदी सरकारने आणून तरूणांची थट्टाच केलेली असुन यामुळे देशभरात युवकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली असल्याचे दिसून येते. 4 वर्षाची सेवा संपल्यानंतर या युवकांना पेंशन देखील मिळणार नसुन अत्यल्प आर्थिक मोबदला दिल्या जाणार आहे. निवृत्ती नंतर तरूणांचे भविष्य अंधकःरमय होणार असल्यामुळे ही योजना त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे.या बाबतचे एक निवेदन प्रदेश काॅंग्रेसच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी शहर काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ताजणे, खुशाल लोडे, यशवंत नक्कावार, अनिल बद्यलवार, महेंद्र कुनघाडकर, दिपक पाटील वाढई, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी गुजरकर, कविता वैरागडे, सुलभा जक्कुलवार, कांग्रेस सेवादल शहर अध्यक्ष लता बारापात्रे, संजय उमरे, गजानन सुर्तीकर, आशिष वांढरे आदींची उपस्थिती होती.
तत्पुर्वी झालेल्या बैठकीत ना. उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वात काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्र्वादी काॅंग्रेसचे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीचे सरकार विरूध्द कुरघोडी करून अस्थैर्य निर्माण करणा-या भाजपाचा निषेध करण्यात आला. देशाचे संसदेत आणि संसदे बाहेर केंद्रातील मोदी सरकारला देशहिताचे प्रश्न विचारणारे काॅंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांना इडीचे माध्यमातुन विनाकारण चौकशीचा ससेमिरा लावणा-या कृतीचाही या बैठकीत निषेध करण्यात आला. काॅंग्रेस पक्षाचे माध्यमातुन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार आणि खा. बाळु धानोरकर यांचे नेतृत्वात जिल्ह्यात लोकहिताचे प्रश्नावरून रस्त्यावर उतरून पुढील काळात तीव्र संघर्ष करू असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला.



