shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विसापूरात अवैध रेतीचा साठा जप्त ; बल्हारपूर महसूल प्रशासनाची धडक कारवाई!

◼️एसडीओ डॉ.दिप्ती सुर्यवंशी व तहसीलदार संजय राईंचवार यांचे मार्गदर्शनाखाली केली पथकाने कारवाई 


◼️ चंद्रपूर-▪️किरण घाटे▪️ 

चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्हारपूर नगरी समिप असलेल्या विसापूर येथे महसूल पथकाने अंदाजे ४१० ब्रास  रेतीचा अवैध‌ साठा नुकताच जप्त केला असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.सदरहू कारवाई बल्हारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी  व या तालुक्याचे तहसीलदार संजय राईंचवार यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे,तलाठी शंकर करलुके व त्यांचे पथकाने केली आहे.सध्या हा जप्तीतील अवैध रेतीचा साठा विसापूरचे कोमल डोंगरे यांचे सुपूर्द नाम्यावर ठेवण्यात आले असल्याचे समजते .या बाबतीत पुढील कारवाई सुरू असल्याचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी आज या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरून बोलताना सांगितले.दरम्यान या कारवाई मुळे  रेती तस्करांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. 






विसापुरात  दोन ठिकाणी  साठा करून ठेवलेली ही अवैध रेती वर्धा नदीच्या पात्रातुन आणली असल्याची चर्चा आहे.परंतु यातील ख-या रेती तस्करांचा अद्याप पत्ता लागला नाही.हे विशेष! बल्हारपूर नगरीसह तालुक्यातील अवैध गौण खनिजांवर अंकुश व दंडात्मक कारवायां करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे हे मात्र तितकेच खरे आहे.चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाच्या देखिल कारवायां जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

close