समाजाप्रती जाणीव ठेवून वाढदिवस साजरे करा - दुर्गेश राठोड
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : २८ / बुधभूषण फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि . २८ जून रोजी करमाळा शहरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
फाउंडेशनचे व्हा .चेअरमन दुर्गेश राठोड यांनी सांगितले की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुधभूषण फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत . प्रथमतः येथील अराध्य दैवत कमलाभवानी देवीच्या दर्शनाने सुरुवात करून देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फाउंडेशनचे मार्गदर्शक पत्रकार आलिम शेख यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . सर्वच तरुणांनी आप्तेष्टांचे वाढदिवस समाजाप्रती जाणीव ठेवुन व सामाजिक उपक्रम राबवुन साजरे करावेत असे आवाहनही यावेळी दुर्गेश राठोड यांनी केले .
या कार्यक्रमा वेळी शाळेचे मुख्याध्यापाक श्री दत्तात्रय काळे, विशेष शिक्षक महादेव खरसडे, गणेश सातपुते,सुदाम सरकुंडे ,कला शिक्षक ज्ञानदेव गुरमे व तानाजी कुंभार उपस्थित होते.
मुलांना विशिष्ठ सांकेतिक भाषेद्वारे विशेष शिक्षक रोहन भालेराव यांनी या उपक्रमाची माहिती दिली. मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना बुधभूषण फाउंडेशनने खाऊ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला . यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व हास्य दिसत होते. तसेच गोशाळे मध्ये जनावरांना बुधभूषण फाउंडेशन चे सदस्य संदीप चुंग व अक्षय परदेशी यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले.
यावेळी श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार गांधी व सदस्य जाकीरभाई पठाण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

