shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वामी समर्थ योग मंडळा व्दारा चंद्रपूर नगरीत योग दिन थाटात साजरा !

चंद्रपूर-किरण घाटे- 

चंद्रपूरातील स्वामी समर्थ योग मंडळ, आक्केवार वाडी निर्माण नगर तुकुम  तर्फे आज मंगळवार  दि.21 जुनला विश्व योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बबनरावजी धर्मपुरीवार यांनी विभूषित केले होते . कार्यक्रमाला  सिंधू चौधरी , दिवाकर राऊतकर ,  गिता गटलेवार आदीं उपस्थित होते सदरहु कार्यक्रमाचे संचालन योग शिक्षिका सुवर्णा लोखंडे यांनी केले . या वेळी बाल योग साधकांनी योग नृत्य सादर केले , त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच योग शिक्षकांचा देखिल या वेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर योग प्राणायाम प्रोटोकॉलनुसार घेण्यात आला. आभार प्रदर्शन रामेश्वरजी खोडे यांनी केले. 







कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा लोखंडे, दिवाकर राऊतकर, मंजुषा निमकर ,करूणा खोडेनिमकर, ज्योती राऊत , कविता वरभे , रंजना माणुसमारे ,वृशाली धर्मपुरीवार , ममता गटलेवार, ज्योती नामेवार, ज्योत्स्ना उपलंचवार, निलीमा शिंदे , कल्यानी येडे,  मिना तायडे , आशा मोसमवार , भोलारामजी  सोनुले , करुणा खोडे , वसंतराव ठेमसकर , विरूटकर काकाजी अरूणा मोहुर्ले ,लता उमक, शिला अंदेलवार , शालिनी कोहळे , जयश्री तपासे , मेनन इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

close