चंद्रपूर▪️किरण घाटे▪️
जागतिक योग दिन तथा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष या पर्वावर चिमूर येथे मंगळवार दि .२१ जूनला सकाळी ५ ते ६.३० या कालावधी दरम्यान अभ्यंकर मैदान येथील खुल्या सभागृहात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती तालुका चिमूर, सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुप यांचे संयुक्तिक विद्यमानाने योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
◼️योगमय जीवनाचा अवलंब करून निरोगी निरामय आयुष्य प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी योग प्राणायाम व व्यायाम अंगिकरावे. चिमुरात सुरू असलेल्या निशुल्क दैनिक योग शिबिरात नियमित जाण्याची सवय पाडून घेण्याचे आवाहन पतंजली योग समितीचे रमेश कंचर्लावर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून केले. प्रथम पतंजली योग समितीचे फाउंडर मेम्बर मुन्नासेठ असावा, पिठाळे, बंसोड सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुप चिमुरचे केमये ,सुनील पोहणकर ,रमेश कंचर्लावार यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. मंचावर निता पोहणकर, शक्ती बंगारे व पुष्पा हरणे यांनी या वेळी प्रात्यक्षिके करून दाखविले. योग विश्वाला भारताची देण आहे. योग शक्ती अंगिकारल्यास विश्वाचे नक्कीच कल्याण होईल असा आशावाद पिठाळे यांनी आपले मनोगतातून व्यक्त करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या.सदरहू कार्यक्रम यशस्वी करण्यास सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुपचे सुनील पोहणकर व त्यांची संपूर्ण टीम, बंसोड , पिठाळे , चिचपाळे , कुरडकर ,महल्ले , चनोडे ,डोलेबांधे,पतंजली योग समितीचे रमेश कंचर्लावार व त्यांची टीम, महिला योग समितीच्या पुष्पा हरणे व त्यांची टीम व महिला योग समितीच्या दुर्गा सातपुते व त्यांची टीम ,लोकेश गोठे यांनी विशेष सहकार्य केले. आयोजित कार्यक्रमात अनेक योग प्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम करीता नगर परिषदेनी हाल उपलब्ध करून दिला. त्याबद्दल नगर परिषदेचे आयोजकांनी आभार मानले. शेवटी पेढे वाटून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

