चंद्रपूर◼️ किरण घाटे◼️
सामाजिक चळवळी मध्ये हिरीरीने भाग घेऊन शिवराय, फुले ,शाहू, व आंबेडकर महापुरुषांचा स्वाभिमानी विचार तरुणां पर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे चंद्रपूर नगरीतील युवा कार्यकर्ते योगेश आपटे यांची ओबीसी जनगणना समन्वय समिती चंद्रपूर महानगरचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती या समितीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे यांनी केली आहे.
◼️ आपटे यांना मुळातच सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांनी आम आदमी पार्टीत काम केले असुन त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.ते बहुजनवादी विचाराने प्रेरित आहे. चंद्रपूरला संविधान दिनी निघालेल्या ओबीसीच्या भव्य मोर्चात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग घेतला होता.शहरातील नेहरू नगर सारख्या मागास वस्तीत वास्तव्याला असून ते बँकेचे दैनिक संकलन कर्ता प्रतिनिधी म्हणून चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या नियमित संपर्कात असतात.
◼️योगेश आपटे यांच्या नियुक्तीने चंद्रपूर शहरात ओबीसी जनगणना समन्वय समितीचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी आपटे यांची महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करतांना व्यक्त केला आहे.

