◼️निवडणूक रणधुमाळीत वंचित कडे वाढतोय उमेदवारांचा कल
राजुरा (चंद्रपूर): ◼️किरण घाटे◼️ -मनसे माजी युवक तालुका अध्यक्ष सूरज भांबरे यांनी काल मंगळवार दि. २१जूनला प्रभारी राजेश बोरकर व जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी शाखा राजुरा येथे पक्ष प्रवेश केला.
शाहू फुले आंबेडकरी विचारधारा मानणारा युवक भोंग्याच्या विषयावर राज्यात वातावरण तापले असल्यामुळे विचारधारेला न पटल्याने मनसे ला राजीनामा देऊन वंचित मध्ये प्रवेश घेतला आहे.
नगर परिषद राजुरा निवडणूकीचे बिगुल वाजले असल्याने काल शहरातील इच्छुक ५० उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. वंचित बहुजन आघाडीचा वाढता कल इतर पक्षांना चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश लिंगमपल्लीवार, जिल्हा सचिव अमोल राऊत, जिल्हा महिला पदाधिकारी निशा ठेंगरे ,अल्का मोटघरे तसेच तालुका कार्यकारणी अध्यक्ष सुशील मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, विजय जुलमे, महासचिव सदानंद मडावी, कार्याध्यक्ष सुभाष हजारे, राजू जुलमे, सच्चीदानंद रामटेके, किशोर रायपूरे, प्रभुदास वनकर आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

