shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राध्यापक व संचालक यांचा संवाद मेळावा संपन्न


 अडसुळ टेक्निकल कॅम्पस तर्फे डॉ. पराग काळकर यांचा  सत्कार

 प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २२ /   रोजी डॉ . विठ्ठलराव विखे पाटील संचलित आय.बी.एम. आर. डी. (एम.बी.ए) विळद संस्थेचे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक, विभाग प्रमुख व संचालक यांचा संवाद मेळावा शनिवार दि . १८ जुन रोजी आयोजित करण्यात आला होता .

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नवनिर्वाचित (डीन) अधिष्ठाता मा. डॉ. पराग काळकर यांचा सत्कार सोहळा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी सर्व संचालक उपस्थित होते. साकेश्वर ग्रामीण विकस सेवा संस्थेचे अडसूळ टेक्निकल कॅम्पसचे उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ अडसूळ यांनी सर्व विभाग प्रमुख व संचालकांशी हितगुज केले.

या कार्यक्रमा दरम्यान डॉ. पराग काळकर यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ अडसूळ, एम. बी. ए. विभाग प्रमुख प्रा. सुहास पाखरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रमेश काकडे, प्रा. गजानन नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. व्यवस्थापन विभागातील विविध विषयांवर मा. श्री विश्वनाथ अडसूळ यांनी डॉ. पराग काळकर यांच्याशी चर्चा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर जाधव होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य प्रा. किशोर जाधव यांनी मार्गदर्शन केले.

या स्तुत्य कार्यक्रमाचे मा.प्रा. अनिरुध्दजी अडसूळ अध्यक्ष अडसूळ टेक्निकल कॅम्पस यांनी विशेष कौतुक केले.
close