चंद्रपूर -◼️किरण घाटे◼️
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे व मुंबई प्रदेश अध्यक्ष सय्यदराजा मुंजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. ५जूनला चंद्रपूर येथील भुवनेश्वर पदमाकर निमगडे यांची पोलिस बाईज असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.याच वेळी नागपूर शहर व नागपूर ग्रामीण या (नागपूर) जिल्ह्याची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
सामाजिक क्षेत्रात नेहमीच निमगडे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. उपरोक्त असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्षपदी भुवनेश्वर निमगडे यांची निवड झाल्या बद्दल चंद्रपूर शहरातील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांसह मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

