shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण !महिला बचत गट व गंधर्व आर्ट स्कुलचा पुढाकार!



चंद्रपूर-◼️ किरण घाटे◼️-चंद्रपूर 
शहरातील बाबुपेठ महिला बचत गट  व गंधर्व आर्ट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिना निमित्य सावित्रीबाई फुले  शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख  अतिथी म्हणून माजी नगरसेवक हनुमान चौके,विवेक पोतनूरवार ,महेश मायकलवार,  ,विशाल घोरुडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, विजय खनके आदीं उपस्थित होते.   



पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी  किंवा कुठल्याही घरगुती  कार्यक्रम निमित्ताने किमान एक तरी वृक्ष लावून त्याची जोपासना करावी असे आवाहन बचत गटाच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडे यांनी  केले . 

प्राचार्य नरेंद्र बोबडे  यांनी पर्यावरणाचे संरक्षण प्रत्येकाने केले पाहिजे यासाठी सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत या वेळी व्यक्त केले . विजय खनके यांनी प्लास्टिक मुळे पर्यावरणात किती प्रदूषण होत आहे त्यासाठी प्लास्टिकचा  वापर करू नये यावर उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले .

शाळेच्या प्रांगणात प्रमुख  मान्यवरांच्या हस्ते या वेळी वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण वर आधारित स्लोगण लिहिलेले फलक घेऊन वृक्षरोपांचे महत्व या वेळी पटवून दिले. सदरहु कार्यक्रमाचे संचालन सुरज बिट्टे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार रितिका पोहाने यांनी मानले . 

आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहल अंबागडे,उज्वला कार्लेकर,रेखा वैरागडे,वर्षा जककुलवार,राणी लेडांगे, नम्रता मोरे,संगीता वंजारी ,संगीता टवलारकर,शालिनी काळे,वंदना खेळकर, शीतल गीन्नलवार,राजकला मोहूर्ले, संगीता चिडे, वर्षा साखरकर,माधुरी नक्षीने,  आदींनी अथक परिश्रम घेतले.
close