shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात सर्पदंशाने ऊसतोड मजुराच्या महाविद्यालयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू !


----------------------------------------------------    
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-
केज तालुक्यातील सातेफळ मध्ये एका ऊसतोड मजुराच्या महाविद्यालयीन मुलीचा विषारी सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


या बाबतची माहिती अशी की, सातेफळ ता. केज येथील उसतोड मजुर रामेश्वर साळुंके यांची मुलगी कु. पायल रामेश्वर साळुंके ही कळंब येथील महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत होती. कु. पायल साळुंके ही दि.९ जून गुरुवार रोजी दुपारी ४:०० च्या दरम्यान घरी झोपलेली असताना तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेच्या शिराजवळ विषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करून उपचार सुरू होते. मात्र दि. १० जून शुक्रवार रोजी तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
close