शरद पवार यांच्या प्रेरणेने व त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे उभा - श्रीमंत ढोले.
इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३वा वर्धापन दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:
शरद पवार यांच्या प्रेरणेने व त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे उभा असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी शुक्रवार दि.१० जून २०२२रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा२३ वा वर्धापन दिना निमित्ताने सकाळी इंदापूर येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वजा वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले.
यावेळी प्रताप पाटील मा.सदस्य,जि. प.,पुणे, श्रीमंत ढोले सर मा.सदस्य,जि. प. पुणे, प्रशांत पाटील मा.सभापती पंचायत समिती इंदापूर, हनुमंतराव बंडगर सदस्य,जि. प.,पुणे, सचिन सपकळ सदस्य जि.नि. मंडळ, अतुल झगडे कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,बाळासाहेब ढवळे शहराध्यक्ष,शिवाजीराव पानसरे सर वरिष्ठ उपाध्यक्ष,,छायाताई पडसळकर तालुकाध्यक्षा महिला ,ॲड.शुभम निंबाळकर तालुकाध्यक्ष युवक ,सचिन खामगळ कार्याध्यक्ष युवक , अश्विनी कुर्डे-राऊत तालुकाध्यक्ष युवती , ऊमाताई इंगोले शहराध्यक्षा,इंदापुर शहर माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, विठ्ठल जाधव सरपंच, संजय रुपनवर सरपंच व इतर मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रताप पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तेवीस वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करून गावोगावी पक्षाच्या शाखा सुरू केल्या. शरद पवार यांचे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहून सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच श्रीमंत ढोले यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, शरद पवार यांच्या प्रेरणेने व त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रवादी पार्टीची ध्येयधोरण समाजातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून करायचे आहे. तसेच सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरांमध्ये पोचवायचा आहे. आणि ते पोहोचवण्याचे काम आपण सर्वजण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
याप्रसंगी अतुल झगडे म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुका जिंकून शरद पवार यांना तेविसाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊ आणि येणाऱ्या निवडणुका जिंकून विजय उत्सव साजरा करू.

