व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात सर्वसमावेशक असणारे नेतृत्व म्हणजेच वरकुटे खुर्दचे पै. बबलू पठाण.
पै. बबलू पठाण यांच्या ३३ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द गावचे लियाकत पठाण व फर्जाना पठाण यांचे सुपुत्र पैलवान बबलू पठाण यांचा जन्म वरकुटे खुर्द येथे १८ जून १९९० साली झाला.बबलू पठाण यांचे प्राथमिक शिक्षण बिजवडी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण राधिका हायस्कूल इंदापूर या ठिकाणी झाले. तसेच कॉलेजचे शिक्षण हे इंदापूर आय कॉलेज या ठिकाणी पूर्ण झाले.
बबलू पठाण हे कुस्ती शौकीन असल्याने लहानपणापासून त्यांनी वरकुटे खुर्द येथील शिंदे वस्ती या ठिकाणी कुस्तीची कसरत आखाड्यामध्ये सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कॉलेज करत असताना मारकड कुस्ती केंद्रांमध्ये ही कसरत केली. कॉलेज नंतर निमगाव केतकी या ठिकाणीही कुस्तीची कसरत केली.
या काळात बबलू पठाण यांनी आपल्या स्वभाव गुणधर्मानुसार अनेक मित्र कमावले त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार तालुका व तालुक्याबाहेर निर्माण झाला.
स्पष्ट बोलणे आणि तत्काळ निर्णय क्षमता असणारे बबलू पठाण यांनी २००९ सालापासून सर्वांच्या सहकार्याने बांधकाम व्यवसायिक क्षेत्रांमध्ये पदार्पण करून अलिषण कंट्रक्शन ची उभारणी केली आणि त्यामार्फत त्यांनी आपले आर्थिक सामाजिक क्षेत्र दृढ केले.
याच काळामध्ये त्यांनी मुस्लिम समाजामध्ये युवा संघटना च्या द्वारे कार्य करण्याचा प्रयत्न केला त्याचे फलित म्हणून इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना कार्यअध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्याद्वारे ते समाज बांधवांच्या सुख-दुःखात नेहमी सक्रिय राहत असतात.
तसेच बबलू पठाण हे हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. बबलू पठाण यांच्या यशस्वी जीवनात त्यांचे आई-वडील मित्र परिवार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त तालुक्यासह इतर भागातील अनेक मित्र परिवाराकडून त्यांना शुभेच्छा व्यक्त होत असताना दिसत आहे.

