शिरेगाव । शिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने संगित नवनाथ कथेचे अडबंगनाथ संस्थानचे महंत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.असा हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात प्रथमच झाल्याचे समजते.
या कार्यक्रमाचे काल काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.आयोजक श्री दिलीप रावजी पाटकर साहेब व गावकरी मंडळी शिरेगाव ता. नेवासा. यांनी अत्यंत मनमोहक व सुंदर व्यवस्था केली होती.
या कार्यक्रमासाठी गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज कोपरगाव बेट, श्याम सुंदर जी महाराज, बजरंग दास महाराज राजस्थान, जंगली महाराज शास्त्री , राजाराम महाराज तुवर, सखाराम महाराज जाधव, रेवजीनाथ बाबा शिंदे, आधी करून साधू संत, खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब. आमदार बाळासाहेब मुरकुटे.आमदार भाऊसाहेब कांबळे. विश्वासराव गडाख साहेब.पुना, मुंबई, नगर,नाशिक महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती भाविक भक्तांनी सदिच्छा भेट दिली. तसेच पंचक्रोशीतील भक्त व भाविक यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

