shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार प्रदान - मांजरी बु.येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम

नीरा भीमा कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार प्रदान 
  - मांजरी बु.येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम
फोटो- मांजरी बु. येथे व्हीएसआयचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व मान्यवर.


 

इंदापूर : प्रतिनिधी दि.5/6/2022
     
शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) चा गळीत हंगाम सन 2020-21 चा मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार रविवारी (दि. 5) व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व संचालक मंडळाने स्वीकारला.
   
मांजरी बुद्रुक येथे आयोजित राज्यस्तरीय साखरेत परिषदेमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे 2 ऊस उत्पादक शेतकरी आनंदराव नामदेव बोंद्रे (रा.निमसाखर) व आबासाहेब तुळशीराम घोडके (पिंपरी बु.) यांना ऊस भूषण पुरस्कार आणि कारखान्याचे पर्यावरण अधिकारी कल्याणराव गायकवाड यांना उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

नीरा-भीमा कारखान्याशी संबंधित एकूण 4 पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले. या पुरस्कारांबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार, मुकादम, अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे हितचिंतक आदी सर्वांचे अभिनंदन केले. नीरा-भीमा कारखान्याला यापूर्वी राज्य व देशपातळीवरील एकूण 11 पुरस्कार मिळाले आहेत, 

अशी माहिती अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी उपस्थित होते.

close