shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरवांगी विविध का. से. सह. संस्थेवर भाजप प्रणित नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनल चा १२-१ ने दणदणीत विजय.

निरवांगी विविध का. से. सह. संस्थेवर भाजप प्रणित नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनल चा १२-१ ने दणदणीत विजय. 
इंदापूर प्रतिनिधी:निरवांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित निरवांगीची पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रिया आज दिनांक ५ जून २०२२ रोजी संपन्न झाली. मतदान झाल्यानंतर मतमोजणी झाली. यामध्ये भाजप प्रणित नंदिकेश्वर शेतकरी पॅनलचे १२ उमेदवार विजयी झाले तर १ उमेदवार राष्ट्रवादी प्रणित नंदिकेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनल चा निवडून आला. त्यामुळे ही निवडणूक १२-१ फरकाने भाजप प्रणित नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनलने जिंकली .

  
सर्वसाधारण मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार:
१)रमेश महादेव गायकवाड २)दत्तात्रय मारुती पोळ
३)महादेव दगडू चव्हाण
४)सुरज लक्ष्मण जाधव
५) सचिन सहदेव रासकर ६)बाळासो आप्पा काशीद
७) पोपट कोंडीबा पोळ 
८)राजेंद्र कुंडलीक गुरव.

 अनुसूचित जाती जमाती :
९) सागर प्रभाकर कांबळे भटक्या विमुक्त जाती जमाती :
१०)दादासो महादेव  पारेकर
महिला राखीव:
११)  केशरबाई चंद्रराव जाधव १२)सुजाता चंद्रशेखर पोळ
तर इतर मागास वर्गातून नंदिकेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे १३) सचिन शिवाजी रासकर हे उमेदवार निवडून आले.

भारतीय जनता पार्टी प्रणित नंदिकेश्वर शेतकरी विकास पॅनलचे १२ उमेदवार हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आल्याचे   
सुभाष पोळ व  बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
close