shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने तहसिलदार पाटील यांचा सत्कार

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील माजी सैनिक विलास खर्डे यांच्या जमिनी कडे जाणारा शिवार रस्ता गेल्या ७० वर्षांपासून नामशेष झालेला होता त्यामुळे त्या  परिसरातील ४० ते ४२ शेतकऱ्यांचा जाण्या-येण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला होता,माजी सैनिक मेजर विलास खर्डे यांनी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याने मा. जिल्हाधिकारी अहमदनगर व नुकतीच राज्य शासनाने दखल घेतलेल्या अमृत जवान सन्मान योजनेअंतर्गत मा.तहसीलदार प्रशांत पाटील,श्रीरामपूर यांच्याकडे त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर जिल्हा उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार व तालुका अध्यक्ष संग्राम जित यादव यांनी त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने पाठपुरावा करत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या गटामध्ये असलेल्या ४० ते ४२ शेतकऱ्यांना या सैनिकी योजनेमुळे व माजी सैनिकांमुळे जाण्या - येण्यासाठी मार्ग मोकळा होऊन मोठा फायदा झाला आहे.

       या गटातील सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने हे काम झाले असुन यामुळे शेतकऱ्यांमध्ये  समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे त्यांचे त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने खुप खुप अभिनंदन,मात्र सैनिकांच्या माध्यमातून एवढा मोठा फायदा झाला असतांना आर्थिक खर्चासाठी मात्र कोणीही पुढे सरसावले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल,एकट्या माजी सैनिकांनी या रस्त्यासाठी लढा देऊन स्वतःची पदरमोड करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, तथा मा.तहसिलदार प्रशांत पाटील यांनी याकामी मोठ्या मोलाचे सहकार्य केले म्हणून त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा, माजी नायब तहसीलदार तथा परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे आणि अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, याप्रसंगी तालुका महिला अध्यक्षा छायाताई मोटे, सुनील भालेराव,संतोष देवराय,प्रदीप विटकरे, भगीरथ पवार , बाळासाहेब बनकर, विलास खर्डे , राम म्हैस , वसंत देसाई, पार्वताबाई देसाई , नजीर सय्यद, राजेंद्र तोरणे ,अजय तोरणे आदी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close