shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेना भाजप युतीचे सरकार बनणार..? एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव ऊध्दव ठाकरे स्विकारणार...??


शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
आज महाराष्ट्रात जनतेचे अनेक प्रश्न, समस्या आहेत.. शेतकरी.., कामगारांचे हाल चालू आहेत. अनेक जनसामान्यांचे प्रश्न आ वासून उभे ठाकले आहेत..
ह्या प्रश्नांचे उकल होण्याऐवजी भलते सलतेच वादळ निर्माण होत आहेत. यात सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. हे सर्व अतिशय दुर्दैवी आहे..

मंत्री संत्री हे जनतेचे प्रतिनिधी आहेत.जनसामान्यांना न्याय देणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे.पण ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष करत लोकप्रतिनिधी स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडताना दिसतात. स्वतःसाठी करोडोंची मालमत्ता कमावतात ..कोणत्या मंत्र्याने खडी फोडून., श्रम करून कमावले आहे..?    

       हे लोकप्रतिनिधी बोटावर मोजण्याइतके काही प्रतिनिधी सोडले तर बाकी सर्व जनतेलच्या पैशावर खुले आम डल्ला मारत आहेत..जनता मात्र उघड्या डोळ्यांनी हे सर्व पहात आहे.. ही घटना नक्कीच अतिशय दुर्दैवी आहे,.

राज्यात जे चालू आहे..ती घटना जनतेच्या हितासाठी नसून जनतेला खाईत लोटून स्वतः च्या भल्यासाठी चालू आहे.. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे. 

१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.
२) बंड केलेच तर 35 आमदार जाणे हे शक्य नाही.
 शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. अडीच वर्षे कार्यकाल मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.
१) उपमुख्यमंत्री पद
२) वाढीव मंत्री पदे.
३) केंद्रात एखादे मंत्री पद
४) ईडी पासून‌ चौकशी बंद होईल.
आणि सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण
५) मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.
हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे. ते कारण म्हणजे 
एकनाथ शिंदे
close