shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल मार्फत होणारी अर्थिक लूट थांबवावी-श्री विलास नाना साळवे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                       गुरुवार दिनांक २३ जून २०२२

डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल मार्फत होणारी अर्थिक लूट थांबवावी-श्री विलास नाना साळवे..!!


राहुरी :  फॅक्टरी येथील डि पॉल इंग्लिश मिडियम स्कुल या शाळेकडून ठराविक व्यावसायिक दुकाणातुनच कपडे खरेदी करण्याची सक्ती केली जाते. तसेच शालेय शिक्षणाची जी पुस्तके असतील ती पुस्तके डि-पॉल या स्कुलमधुनच खरेदी करावी लागतात याव्यतिरीक्त जर शालेय कपडे (ड्रेस) व शालेय पुस्तके इतर ठिकाणाहून घेतली तर त्यांना शाळा सोडल्याचा दाखला हातात देण्याची धमकी दिली जाते. 
त्यामुळे शाळेकडून होणारी आर्थिक लूट थांबवा या मागणीचे निवेदन रिपाइं आठवले गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या वतीने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देण्यात आले. 

      या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची कुठली शिकवणी घेण्यात आली नाही कि पालक मेळावा घेण्यात आलेला नाही तरी देखील शाळेने शंभर टक्के फि आकारली होती. अशा शोषण करणाऱ्या शाळेची चौकशी करुन आम्हाला न्याय मिळावा व अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close