shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सारोळा कासार ग्रामपंचायतची ताडपत्री चोर गजाआड..!



नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील सारोळा येथील रामनगरी मंगल कार्यालय येथुन अज्ञात व्यक्तीने दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी दिड लाख रुपये किंमतीची ताडपत्री चोरीला गेली होती. या चोरीची तक्रार नगर तालुका पोलिस येथे १०५/२२ भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होता.सदर गुन्ह्यांचा तपास चालू असताना  साह्य.पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या गोपनीय  माहिती वरुन नितीन बाळासाहेब कडुस (वय ३४) यांस ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील दिड लाख रुपये किंमतीची ताडपत्री हस्तगत करण्यात आली आहे‌. 
 
   
सदरची कामगीरी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली साह्य.पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप, पोलिस हवालदार गव्हाणे, पोलिस नाईक रमेश शिंदे , पोलिस हवालदार रावसाहेब खेडकर नगर तालुका पोलिस स्टेशन पथकाने हि कामगिरी केली.
close