shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी वृध्द महिलेची शेतजमीन बेकायदेशीरपणे फेरफार करून हडप !

◼️दोषींवरती कायदेशीर कारवाई करा-चंद्रपूर आपची मागणी !


चंद्रपूर◼️किरण घाटे जि.प्र.◼️ 

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील आकापुर येथील तुळजाबाई चिरकुटा मडावी यांची भूमापन क्रमांक 43 क्रमांक 1.55 हेक्टरआर शेत जमीन राजेश्वर सोनबा भाकरे यांनी  रेकॉर्ड मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून आपल्या नावे केली .इतकेच नाही तर सदरहु शेतीवर कब्जा देखिल  केला असल्याची  तक्रार आम आदमी पार्टी चंद्रपूर कडे प्राप्त झाली आहे. 




या संदर्भात पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता आपच्या महिला अध्यक्षा ॲड. सुनिता पाटील यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी आपचे शहर सचिव राजू  कुडे, संघटन मंत्री सुनील भोयर, महिला उपाध्यक्ष रूपा  कातकर, महिला सचिव आरती  आगलावे, युवा महानगर अध्यक्ष संतोष बोपचे, युवा महानगर साचिव डॉ. देवेंद्र अहेर,  अमजद खान, सलीम शेख, लक्ष्मण पाटील तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.

close