shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगा केल्यामुळे जीवन व्याधीमुक्त, व्यसन मुक्त होते - दशरथ माने.

योगा केल्यामुळे जीवन व्याधीमुक्त, व्यसन मुक्त होते  - दशरथ माने.
 इंदापूर प्रतिनिधी:निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योगा हा प्रत्येकाने केलाच पाहिजे योगाने जीवन व्याधीमुक्त होते कामाची गती आणि तीव्रता वाढते अधिकाऱ्यांनी योगा प्राणायाम दररोज केला तर मानसिक ताण-तणाव कमी होऊन भ्रष्टाचार कमी होतो योगामुळे नवीन पिढी व्यसनमुक्त आणि सुसंस्कारित होते स्वामी रामदेव जी महाराज आणि श्री श्री रविशंकर यांच्या इंदापूर मधील योग शिबिरामुळे ४० हजार लोकांना फायदा झाला आहे असे मत सोनई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले
         स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूर यांचे वतीने इंदापूर नगरपालिके समोरील मैदानात सोनाई परिवाराच्या सौजन्याने आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला .
 सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला दिपप्रज्वलन सरकारी वकील अॅड. मनोहर चौधरी अॅड.जालिंदर बसळे, पशुधन विकास उपायुक्त डॉ.संजय शिंदे कृषी अधिकारी देविदास सारंगकर , सायरा भाभी आत्तार उमाताई इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. 

   युवा प्रभारी प्रशांत गिड्डे आणि सचिन पवार यांनी व्यासपीठावरून याॅगींग जॉगिंग सूर्यनमस्कार, विविध आसने ,प्राणायाम ,यांची प्रात्यक्षिके सादर केली.शेवटी शांतिपाठ आणि वंदे मातरम घेण्यात आले.
   यावेळीप्रथम वर्ग न्यायालय न्यायाधीश कलाल साहेब,  मनोहर चौधरी,जालिंदर बसळे, नगराध्यक्ष अंकिता शहा,शिवसेना शहराध्यक्ष महादेव सोमवंशी हमीदभाई आतार, जयकुमार शिंदे,रमेश शिंदे उपस्थित होते.विविध शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, सामाजिक संस्थातील  नागरिक बहुसंख्येने सहभागी होते. 
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोळ आणि रवींद्र परबत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिभीषण खबाले, चंद्रकांत देवकर, रामेश्वर साठे, बाजीराव शिंदे, अण्णासाहेब चोपडे ,भालचंद्र भोसले, विकास खिलारे, देवराव मते, पांडुरंग झोळ ,विक्रम पोतदार ,उज्वला घोगरे,सुनिल कांबळे,पियुष बोरा, रेखा भंडारी यांनी अथक परिश्रम घेतले. 

    पतंजली योग समिती युवा भारत यांच्या वतीने नगरपालिके जवळील शाळा नंबर एक व दोन येथे नियमितपणे मोफत स्थायी वर्ग घेतला जातो.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जनजागृतीसाठी जनजागरणन मशाल रॅली आणि रन फाॅर योगा यांचे आयोजन करण्यात आले होते.
close