स्व.सदाशिवराव (भाऊ) इंगळे पॕनलचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या कळमअंबा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसला हाबाडा दिला आहे.
गेल्या चाळीस वर्षापासुन कळमअंबा सेवा सहकारी सोसायटी ही माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या ताब्यात होती. चेअरमन कै.सदाशिव भाऊ इंगळे व माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर हे समीकरण गेल्या चाळीस वर्षापासुन कायम होते.
या वर्षी 2022 च्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तरी ही आडसकर व इंगळे हे समीकरण कायम ठेवत अॕड बालासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत.
या पॕनलचे उमेदवार अॕड.बालासाहेब इंगळे ,पठाण युनुस बडेखाँ, इंगळे अरुण बाबासाहेब ,इंगळे कांताराम दिगांबर ,केंद्रे संदीपान पंढरी,धायगुडे गोपिनाथ मुक्ताराम,रुपनर रामभाऊ हारीभाऊ, शेंडगे दत्ताञय आश्रुबा, सपकाळ महादेव हारीभाऊ,हिरवे कचरु विठोबा ,ढवारे कांचन केशव,माने सिमींताबाई सुखदेव, माने सातोराम तुळशीराम विजयीझाले आहेत.
या विजयामुळे अॕड.बालासाहेब इंगळे व सर्व विजयी उमेदवार यांचे अभिनंदन भाजपा नेते रमेशराव आडसकर,नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.

