shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अग्निपथ योजना तात्काळ मागे घ्या- आम आदमी पार्टी व युथ विंगचे चंद्रपूर जिल्हाधिका-यां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर!

चंद्रपूर-▪️किरण घाटे-▪️

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे देशामध्ये शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे .अनेक राज्यांमध्ये तरुणांई रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेचा तीव्र निषेध करीत आहे . ब-याच ठिकाणी हे आंदोलन हिंसक झाल्याचं बघायला मिळत आहे.



◼️या योजनेत सैन्य दलात सामील झालेले सैनिकाना केवळ चार वर्ष आपली सेवा देणे असून त्यातील 25% सैनिकांना मुख्य प्रवाहात सैन्यात घेतले जाणार तदवतच उर्वरित म्हणजेच 75% सैनिकांची सेवा संपुष्टात येणार असून त्यांना  सरकार व्दारे पेन्शन किंवा मेडिकलची कुठली ही सेवा मिळणार नाही. सदरहु योजनेमुळे शत्रूशी लढताना आपला कार्यकाळ संपत असल्याच्या काळजीने सैनिकांचे खच्चीकरण सुध्दा होईल. यामुळे आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाईंला याचा विरोध करावा लागत आहे


वरील योजनेमुळे अनेक घटना देशात घडू शकतात .ज्यात देशाच्या आंतरिक सुरक्षेचा सुध्दा प्रश्न निर्माण होऊ शकतो जे 75% सैनिक वयाच्या 23-24 व्या वर्षी निवृत्त होतील असे सैनिक अतिरेकी याच्या निशाण्यावर असतील. नक्षलवाद सुद्धा आपले पाय पसरवण्यास पुढे सरसावेल.

सदर योजनेतील महत्त्वाचा भाग असा की निवृत्त सैन्यांना पेन्शन  नाही. जर एखादा आमदार दोन दिवसा नंतर राजीनामा देत असेल तर त्याला आजीवन पेन्शन दिल्या जाते परंतु जो जवान देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून देशाची रक्षा करतो, प्राणाची आहुती देतो, त्याला मात्र पेन्शन नाही मेडिकलची कोणती सुविधा नाही, यातून एकच निष्पन्न होते की ही योजना रक्षा विशेष तज्ञ यांच्याकडून सल्ला न घेता तयार करण्यात आलेली आहे.  उपरोक्त योजना ही अनेक प्रश्न निर्माण करणारी असून या योजनेमुळे देशात आर्मी भरतीच्या तयारी करीत असणा-या युवकांच्या आत्महत्या करण्याचा आकडा सुद्धा वाढीवर आहे ‌.

सरकारने नम्रतेची भूमिका घ्यावी आणि हा कायदा त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम आदमी पार्टी संपुर्ण देश भर तिव्र आंदोलन उभारेल यांस जबाबदार केवळ केंद्र सरकार असेल. उपरोक्त विषयांकित मागणी तीनही दलाचे प्रमुख राष्ट्रपती यांना शहर सचिव राजू कूड़े , युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एका निवेदनातून करण्यात आली.या वेळेला आम आदमी पार्टीचे आम आदमी पार्टी महिला अध्यक्षा ॲड. सुनीता  पाटील जिल्हा सचिव संतोष  दोरखंडे  महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख ,महिला सचिव आरती आगलावे बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, अमजत भाई,महेश पाजी, वंदना कुंदावार सतीश, सरफराज भाई, अल्फीया अमजद खान आदीं उपस्थित होते.

close