shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भिमा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

निरा भिमा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
इंदापूर : प्रतिनिधी दि. 24/6/22
फोटो:- निरा भिमा कारखान्यामध्ये मिल रोलर पूजन प्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील व मान्यवर.

      शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 च्या गळीत हंगामासाठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलर चे पूजन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, संचालक उदयसिंह पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.24) करण्यात आले.
   कारखान्याचे संस्थापक व माजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नीरा भीमा कारखाना आगामी गळीत हंगामात 8 लाख मे.टन उसाचे गाळप पूर्ण करेल, अशी माहिती यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी दिली. प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संचालक विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
___________________________

                   
close