बुद्धीबळाचा खेळ जसा
सैनिक लढाईत असे पुढे
राजा वजीर सुरक्षीत मागे
राजकारणात कार्यकर्ते पुढे
खेळ राजकारणाचा !!१!!
घड्याळाचे काटे फिरतात
हाताचे पंजे घुटमळतात कुठे
धनुष्यातीला बाण सुटला
नेमका निशाणा वेदला कुठे
खेळ राजकारणाचा !!२!!
घड्याळ वेळ सांगते अचूक
कार्य करत असते बिनचूक
धनुष्यातील टोकदार बाण
निशान साधत असते खोचक
खेळ राजकारणाचा!!३!!
कमळ फुलाचा सुगंध
दरवळतो आहे दूरवर
अत्तराचा मन मोहक गंध
मनावर घाव घालतोय खोलवर
खेळ राजाकारणाचा!!४!!
कवी:-सुरेश वडर(पुनाळकर)
मो.नं,9821218084

