shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुनाळ केंद्रशाळेत अक्षर पाट्यांचे वाटप‌..!


पुनाळ । प्रतिनिधी:-
पुनाळ (ता.पन्हाळा) येथील शंकरराव चव्हाण केंद्रशाळेत अक्षर पाट्यांचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी केंद्रमुख्याध्यापक तानाजी घरपणकर होते.स्वागत पंडित पाटील यांनी करुन अक्षर पाटीचे महत्व सांगितले.दोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश झाला.

त्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले.सुंर अक्षर हाच खरा दागिना आहे.याची जाणीव ठेवत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अक्षर वळणदार होण्याच्या दृष्टीने अक्षर पाट्या वाटप करण्यात आल्या.येथील सामाजिक कार्यकर्ते व नाट्य दिग्दर्शक रंगराव कारंडे यांनी आपले वडिल ज्ञानू कारंडे यांच्या स्मरणार्थ पंचेचाळीस अक्षर पाट्या दिल्या.संभाजी रंगराव पाटील (यवलुज) यांच्या हस्ते अक्षर पाट्यांचे वाटप करण्यात आले. गावातील नागरिक विविध माध्यमातून शाळेला, विद्यार्थ्यांना मदत करत असतात.त्याचाच एक भाग म्हणून रंगराव कारंडे यांनी दिलेली मदत प्रेरणादायी असल्याचे मुख्याध्यापक तानाजी घरपणकर यांनी सांगितले.यावेळी नारायण कारंडे, धनाजी पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद चौगले, उपाध्यक्ष संभाजी पवार, सरदार बाडे, बाजीराव झेंडे,सुमन चव्हाण,सुमन चौगले,उषा पवार, आक्काताई पोवार,शारदा पाटील,सर्व सदस्य,अंगणवाडी सेविका, मदतनीस,सर्व पालक, आनंदा बोळावे,नादी फाउंडेशनच्या सदस्या, आरोग्य सेवक दीपक बाटे, बाबुराव कामत,संजय कुंभार,मनोज रानभरे, पल्लवी रानभरे,लिलाधर अमरापूरकर,कुंजन सातपुते, प्रकाश मगदूम, शहाजी बोळावे,कृष्णात सुतार,ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.आभार रंगराव कारंडे यांनी मानले.

पुनाळ- अक्षर पाट्यांसमवेत पहिलीचे विद्यार्थी व पालक.
close