चंद्रपूर-किरण घाटे-
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी ओंकारला शिक्षणासाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत नुकतीच दिली आहे.
ओंकार संभाजी खोब्रागडेला शिक्षण घेण्यासाठी कौटुंबिक आर्थिक अडचण आल्याने पुढील शिक्षण घेणे अवघड ठरत होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आमदार भांगडीया यांची भेट घेत त्यांना विंनती केली
आमदार भांगडीया हे आपल्या क्षेत्रातील मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून मदतीचा हात देत असतात हे येथे उल्लेखनिय आहे.
ओंकारला मदत सुपूर्द करीत असताना भाजपचे प्रवीण गणोरकर, रमेश कंचर्लावार, अरुण लोहकरे, तुकडूदास गजभे आदीं उपस्थित होते.


