घूग्घुसला भाजपाच्या वतीने कुलजारचे वाटप
घूग्घुस (चंद्रपूर)▪️ किरण घाटे
घूग्घुस येथील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे स्नेहभेट देण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अनेक भाजीपाला व फळ विक्रेत्यांची येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मोफत प्रत्येकी एक पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.
या वेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले कि देशातील किरकोळ भाजीपाला व फळ विक्रेत्यांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. सुधीर मुनगंटीवार हे नेहमी गोरगरिबांच्या सेवेत असतात. यापूर्वी त्यांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. छत्री, रेनकोट, नोटबुक वाटप असो अथवा कोरोना मध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य किट, मास्क वाटप असो सुधिरभाऊ सदैव गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून येतात.वाटप कार्यक्रमात
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प .सभापती नितु चौधरी, माजी प .स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, उत्तर भारतीय आघाडीचे रत्नेश सिंग, संजय भोंगळे, राजेश मोरपाका, तुलसीदास ढवस, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, श्रीकांत सावे, मधुकर धांडे, नितीन काळे, शाम आगदारी, महेश लठ्ठा, विक्की सारसर, निरंजन डंभारे, राकेश भेदोळकर, निरंजन नगराळे, सतीश कामतवार आदीं या वेळी उपस्थित होते.



