shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रयत्न डेव्हलपर्स / शिवशाही प्रतिष्ठान च्या वतीने वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याची मशीन ग्रीन फाऊंडेशन यांस भेट

लोणी काळभोर  - ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजीत लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर परिसर १ लाख  वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे या कार्याला चालना मिळावी तसेच जास्तीत जास्त वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धन व्हावे या अनुषंगानेच प्रयत्न डेव्हलपर्स/ शिवशाही प्रतिष्ठान यांच्या वतीने खड्डे खोदण्याची मशीन ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांस  भेट दिली. 

या वेळी श्री. अनिषशेठ काळभोर, श्री.युवराज शेठ काळभोर, श्री.सचिन शेठ झेंडे, श्री.प्रमोद भाऊ काळभोर, श्री.दत्तात्रय शेंडगे,श्री. मंगेश कोळपे,श्री.अभिजीत बोधे, उपस्थित होते. तसेच ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांनी प्रयत्न डेव्हलपर्स तसेच शिवशाही प्रतिष्ठान यांचे आभार मानले.
close