shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकाच माळेचे मणी



राजकारणी सारे एकाच माळेचे मणी
यांची ओढ फक्त होण्या सत्तेचे धनी..

कुणी शपथ घेते पहाटे..
कुणी पोहचते गुवाहटी..

कोणी वाजवले भोंगे..
कोणी घडवले दंगे..

नेत्यांसोबत बदलत राहतो झेंडा..
पण कधी ना कळला यांचा अजेंडा..

महापुरुषांच्या नावाने झाले सदैव राजकारण..
सर्वसामान्यांच्या ध्यानी न आले सत्तेचे समीकरण..

सत्तेसाठी प्रत्येक वेळी शब्द वापरला समाजहित..
हव्यासापोटी लाळ गाळणाऱ्यांची हीच आहे रीत..

    विजय उषा शहाजी कदम..
   रहिमतपूर,,सातारा
close