shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाचे धुरंधर व लढवय्ये नेते भाऊलाल पवार यांचे अपघाती निधन..!

जालना । प्रतिनिधी :
सामान्य परिस्थिती साधी राहणी पण करारी बाणा, कुशल नेतृत्व असलेला नेता  कै.श्री भाऊलालजी पवार यांचे अपघाती दुःखद निधन बुधवारी दिनांक ०१/०६/२०२२ रोजी रात्री ९:३० सुमारास झाले.अंत्यविधी गुरवारी दिनांक ०२/०६/२०२२ सकाळी ११:३० वाजता जामवाडी, जालना येथे झाले आहे.

        स्व.भाऊलाल पवार

वडार समाजातील धडाडीचा नेता,कार्यकर्ता,वडार समाज संघ या संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष कै.श्री.भाऊलालजी पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यातील अखिल वडार समाजात हळहळ व्यक्त होत आहे.. 

त्याचप्रमाणे आसपास  जिल्ह्यातील सर्व त्यांचे सहकारी मित्र परिवार , राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते त्यांच्या अंत्ययात्रेत अंतिम निरोप देण्यासाठी हजारो आप्तेष्टासहीत  उपस्थित होते.

           कै.श्री.भावलालजी पवार यांचा जीवनप्रवास अनेक संकटांवर मात करून अत्यंत संघर्षमय जीवनातून भाजून निघालेले ,आपल्या कुटुंबाची परिस्थिती सामान्य असताना, जालना जिल्ह्यातील वडार समाजातील ओळखीतल्या प्रत्येक गरजू व अडचणीत आलेल्या माणसाला त्यांनी मदत केली आहे व मदतीला तत्पर धावून आले आहे. त्याचप्रमाणे जास्त शिक्षण नसताना सुद्धा राज्य स्तरावर कुशल संघटक ही त्यांची ओळख होती.समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग समाजाच्या न्याय हक्कासाठी गल्ली पासून तर मंत्रालयापर्यंत जाऊन रोखठोक भूमिका बजावणारे, आपल्या बांधवांच्या हाकेला धावून येणारे,ओळखीतले किंवा बिगर ओळखीतले असे भेदभाव न करणारे भाऊलालजी पवार आज आपल्यात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

                          सामाजिक बांधिलकी, समाजाचं देणं लागतो या न्यायाने वडार समाजाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.वडार समाज संघ या संघटनेचे कार्याध्यक्ष पद त्यांनी उत्तम प्रकारे , कुशलतेने सांभाळले आहे. एक जबाबदार नागरिक ते गावातील सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषविले आहे. ऐन उमेदीच्या, प्रगतीच्या वाटेवर असताना अचानकपणे  त्यांच्यावर काळानं घाला घातला आणि या भुतलावरील त्यांचा जीवनप्रवास संपुष्टात आला.त्यांचे सहकारी बंधू श्री. विठ्ठल लष्कर यांचं ही या अपघातात मृत्यू झाला आहे.दोघे एकाच गावातील  एकाचवेळी दोघांचाही अंत्यसंस्कार करण्यात आले.



          स्व.विठ्ठल लष्कर

                  दोघांच्या अकाली जाण्याने पवार आणि लष्कर कुटुंबासह सर्व वडार समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुःखद बातमीने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या या अचानक झालेल्या एक्झिट ने जालना जिल्ह्यातील वडार समाज पोरका झाला आहे.मित्रांनो या एका निष्ठावान कार्यकर्त्यांची जीवनकहाणी जवळून पाहिली तर आपल्या सगळ्यांचा डोळ्यात अश्रू तराळल्या शिवाय राहणार नाही.त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार लहान लहान मुलीं आहेत.मुलगा नाही, विचार जर केला तर एका मुलीचे शिक्षण आणि तिचा विवाह करण्यापर्यंत किती खर्च लागेल.या माऊलीला चार मुलींचे शिक्षण आणि त्यांचे संगोपन करणे किती कठीण जाणार आहे.ज्यांना खूप काही असून सुद्धा दमछाक होते तर या महिलेने कसं उभं राहावं... हे नमूद करण्याचे कारण म्हणजे बरेच कार्यकर्ते आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, परिस्थितीचा विचार न करता, आपल्या मुलाबाळांचा कुटुबांचा विचार न करता समाजासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी रात्रंदिवस फिरत असतो.समाजासाठी फिरणे वाईट नाही ते तर आपले कर्तव्यच आहे पण त्याचबरोबर आपल्या परिवाराची काळजी ही तितकीच महत्त्वाची आहे.



               कोणीही कार्यकर्ता असो, कुठलेही कार्य असो आपण जेंव्हा एखाद्या  पक्ष, संघटनेचे किंवा समाजाचे कार्य करतो.हे कार्य उस्फुर्ततेने करा काही हरकत नाही परंतु त्याच बरोबर आपला परिवार उघड्यावर पडणार नाही, परिवाराची फरफट होणार नाही, आपल्या या कार्यामुळे परिवारावर काही संकटं येणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे.त्याचबरोबर आपली ही ओढाताण होणार नाही याची ही दक्षता काळजी घेतली पाहिजे.



     जालना  शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री अर्जुनजी खोतकर साहेब यांनी व वडार समाज संघ या संघटनेचे पदाधिकारी श्री अशोकजी कुलाल यांनी श्रद्धांजली अर्पण करताना वरिल विचार चिंतनातून  त्यांनी काही अनुभव  व्यक्त केले.. खरोखरच अनेक कार्यकर्ते पडद्यावर झळकतात पण काही पडद्याआड आपली भूमिका साकारुन एक दिवस सर्वांना सोडून जातात आणि ते समाजाच्या कायम विस्मरणात राहतात.ही खेदाची गोष्ट आहे.काही बंधने स्वतःहून घेतलेले बरे.पण जिथं जिथं आपली आवश्यकता पडेल तिथं आपण उभे राहिले पाहिजे.सामाजिक बांधिलकी समाजाचं देणं लागतो यासाठी उभे राहिले पाहिजे.एका निष्ठावान कार्यकर्त्याची किंमत खूप मोठी आहे.दहा हजार लोकांमधून एखादा निष्ठावंत कार्यकर्ता उभा राहतो.लाखातून एखादा नेता तयार होतो.कोट्यावधी जनतेतून एखादा विराट पुरुष जन्माला येतो.याचा काळ मोजला तर एक सामान्य कार्यकर्ता तयार करण्यास दहा ते वीस वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागतात तेंव्हा कार्यकर्ता घडत असतो.नेता घडणे व  घडवण्यासाठी वीस ते चाळीस वर्षे लागतात आणि एखादा विराट पुरुष जन्माला येण्यासाठी पन्नास ते शंभर वर्षांत लागतात.म्हणून प्रत्येक माणुस प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे.समाजातील प्रत्येक बांधवांनी आपल्या कुटुंबाला आपल्या जवळील व्यक्तीला, मित्रांना, आप्तेष्टांना समजून घेतले पाहिजे व सांभाळले पाहिजे.मित्रांनो कोरोना काळातील विचित्र प्रसंग ज्यांनी ज्यांनी अनुभवले आहे त्यांना माहीत आहे की आपल्या डोळ्यासमोर काहींचे उध्वस्त झालेले संसार ,कुणाचे छत्र हरपले तर कुणाचे महागाई, बेरोजगारी ने हाल झालेले आहे.. तेंव्हा आपल्या माणसांची किंमत ओळखा, आपली माणसं जपा .पद पैसा येईल जाईल याच्या हव्यासापायी कुणाचाही राग, द्वेष, ईर्ष्या करु नका.एकवेळ पैशाचा अहंकार जाते पण बुद्धीचा अहंकार जात नाही.मायबापहो माझा या शिकलेल्या लोकांना एक विनंती आहे की, त्यांनी एखाद्या कमी शिकलेल्या, सामान्य परिस्थितीतील व्यक्तीला हलकं समजू नका.त्यांच्याकडे काही जरी नसले तरी त्यांच्या कडे जबरदस्त उर्जा आणि जिद्द असते,उभारी असते, शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असते.

दोन्ही मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली उभयतांना उर्ध्व गती व चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!🙏



"काळजी घ्या! आपली, आणि आपल्या माणसांची!"
"मनाम अंदार वड्डाल वगाटे उंडाम" |
"जय बजरंग जय वडार" | "जय हिरोजी जय शिवराय" |


आपलाच एक बंधू

मच्छिंद्र धनवटे, औरंगाबाद.
close