shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थान मध्ये स्वराज्य पोलीस मित्र कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करणार : सचिन दिघे


राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ३०-५

     सतत समाजाच्या सेवेसाठी आणि पोलीस मित्रांसाठी काही तरी नवीन करावे या हेतूने स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटने चे संस्थापक अध्यक्ष मा श्री दिपक कांबळे व मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे देवा यांची धडपड चालू असते आणि त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे गुरु यांनी शनी जयंती चे औचित्य साधून आज आपल्या राहुरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या सह अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे भेट दिली.

 यावेळी सचिन दिघे यांचा ट्रस्ट चे अध्यक्ष भागवत बानकर यांचे वडील मा सोपानराव बानकर यांनी सत्कार केला. यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष विकास बानकर हे उपस्थित होते. त्यानंतर कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, कार्यालयीन अधिकारी लक्ष्मण वाघ, मुख्य सुरक्षा अधिकारी संभाजीराजे बोरुडे, यांच्या उपस्थितीत ट्रस्ट चे मॅनेजर संजय बानकर यांच्या कडे संघटने च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष जावळे, राहुरी तालुकाध्यक्ष शकंर कवाणे, गणेश हिंगे, लक्ष्मण धाडगे, रेवनाथ ढसाळ, प्रकाश गुलदगड, सोन्याबापू तनपुरे, प्रसाद मुरकुटे, आसाराम घावटे, अनिलराव गिते, विशाल सांबरे, कृष्णा नगेडे, दिपक नालकर, गणेश पठारे, लहानु जोशी, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख संतोष आहेर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
close