shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" साकळाई " ला पाणी उपलब्ध, कोकणाचे पाणी मिळणार.


साकळाई ची आशा पुन्हा पल्लवीत...


नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-

नगर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना बहुचर्चित  वरदान ठरणारी  साकळाई पाणी योजनेला कोकणाचे पाणी मिळणार आहे. (दि.४) जुनं रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यातत कोकणात वाहुन जाणारे साडेआठ टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्याची मान्यता मिळाली आहे. त्यातुन साकळाई पाणी योजनेला पाणी द्या. त्यासाठी किती पाणी लागेल याचा प्रस्ताव पंधरा दिवसांत तयार करा.अशा सुचना जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडु यांनी सुचना अधिकार्याना दिल्या. 

       




साकळाई उपसा जलसिंचन योजनेला पाणी उपलब्ध करुन देणे, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे आदी विषयांवर राज्यमंत्री बच्चू कडू याच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील जलसंपदा विभागात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्य अभियंता, उपअभियंता यांच्यासह नगर जिल्ह्यातून प्रहार वारकरी संघटनेचे अजय महाराज बारस्कर, माजी सनद अधिकारी जगन्नाथ भोर, गुंडेगावाचे उपसंरपच संतोष भापकर,माजी उपसंरपच मंगेश हराळ, सतिश चौधरी, संजय भापकर अदि उपस्थितीत होते. सह्याद्रीच्या कड्यावरून कोकणातुन जाणार्या  साडेआठ टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्याची मान्यता मिळाली आहे. त्यानंतर नव्याने पाणी वाटप करता येवू शकते. असा प्रश्न जलसंपदा अभियंत्यानी उपस्थितीत केला. त्याला जगन्नाथ भोर यांनी हरकत घेत साकळाई योजना १९६६ साली संयुक्त प्रकल्पात मंजुरी मिळाली होती. पुन्हा साकळाई योजनेला पुर्ण:मान्यता १९९४ साली मिळाली आहे. साकळाई उपसा योजना ही सर्वात जुनी प्रास्ताविक योजना आहे. कोकणातुन वाहून जाणारे साडेआठ टीएमसी पाणी पूर्वेकडे वळविण्याची मान्यता मिळाली आहे. अडीच टीएमसीची वाट पाहत बसण्याची गरज नाही. उपलब्ध पाण्यापैकी साकळाई योजनेला पाणी द्यावे अशी मागणी मंत्र्याकडे केली. त्यावर तत्काळ प्रस्ताव तयार करा आणि पंधरा दिवसात कार्यवाही करा आसे सक्त आदेश राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले व कार्यवाही करा असा सुचना केली.

       

यावेळी गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर यांनी गुंडेगाव वरदान मोहरवाडी जल जीवन मिशनची मंजुरी दिल्याबद्दल जलसंपदा  राज्यमंत्री बच्चू कडू तसेच राज्याचे पाणीपुरवठा पव मंत्री गुलाबराव पाटील यांना अभिनंदन  ठरावाचे पत्र मंत्रालयात दिले. ही योजना लवकरच मार्गि लागणार आहे. आशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ कार्यालयांनी दिली....

close