shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा - ग्रीन फाऊंडेशन


लोणी काळभोर:-  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणी काळभोर येथील ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य , वनव्यवस्थापन समिती लोणी काळभोर, वनविभाग लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात  एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आला.झाडांना पाण्याची सोय व्हावी या साठी तीर्थक्षेत्र रामदरा येथील तलावातील पाणी १५०० फुट पाईप लाईन घेऊन डोंगरावर नेण्यात आले आहे. 

          तेथील परिसरात ५००० लिटर पाणी टाकी  बसविण्यात आली आहे. तसेच महादेव मंदिर परिसरात रामा कृषी रासायनिक कंपनी लोणी काळभोर यांच्या वतीने १० ते १२ फुटी  ५०० वृक्ष ग्रीन फाऊंडेशन यांस देण्यात आले या मध्ये  वड ,पिंपळ, कडुनिंब, चिंच,खैर, आंबा ,चिकू, जांबुळ अशा अनेक प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्यात आली.

        या वेळी रामाकृषी रसायन लिमिटेडचे श्री.पांडे साहेब, श्री.शर्मा साहेब,पंचायत समिती सदस्य सनीशेठ काळभोर, लोणी काळभोर सरपंच सौ.माधुरीताई काळभोर, ग्रा.सदस्य भारतीताई काळभोर, ग्रा.सदस्य सविताताई लांडगे, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर,माजी उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर,राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष अमित काळभोर, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भाऊ शेंडगे, ग्रीन फाउंडेशन पुणे महिला जिल्हाध्यक्षा सौ.योगिता घुले, मधुकर सर कुमावत, 
नितीनजी महाराज जंजीरे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ (तात्या) गायकवाड तसेच  ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, रामाकृषी रसायन लिमिटेडची सर्व टीम. आदी मान्यवर उपस्थित होते.

           या वेळी सूत्रसंचालन किरण भोसले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राहुल शेठ कुंभार यांनी मानले.
close