शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २१ जून २०२२
महात्मा फुले कृषि विद्यापीठात आठवा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा ; तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी योगाचा अभ्यास गरजेचा- अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ..!!
राहुरी विद्यापीठ, : योग अभ्यासामुळे जीवन रोगमुक्त होऊन मनाचे स्थैर्य लाभते आणि जीवनात सकारात्मकतेची भावना निर्माण होती. या धकाधकीच्या जीवनात योगचा उपक्रम आपण जीवनभर राबविला पाहिजेे. यामुळे जीवन तनावमुक्त होऊन निरोगी जीवन जगणे शक्य होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, पदव्युत्तर महाविद्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगाव आणि सावित्रिबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्तरित्या आयोजीत आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. रसाळ बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अहमदनगर येथील निवृत्त प्राध्यापक व योग शिक्षक श्रीधर धास उपस्थित होते.
याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, उद्यानविद्या विभागाचे डॉ. भगवान ढाकरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहाण, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, सावित्रिबाई फुले माध्यमिक व उच्चमाध्यमीक मुख्याध्यापीका सौ. आशा धनवटे, सावित्रिबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब खेत्री आणि प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.
योगशिक्षक प्रा. श्रीधर धास मार्गदर्शन करतांना म्हणाले की आपल्या प्रत्येकामध्ये ज्ञान हे स्थित असते, फक्त त्यावरील आवरण काढण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणामध्ये मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता असते. मन एकाग्र होण्यासाठी योग अभ्यास नितांत गरजेचा आहे. यावेळी प्रा. धास व श्री. देवेंद्र वंजारे यांनी उपस्थितांकडून वेगवेगळ्या प्रकारची 21 आसने व 7 प्रकारचे प्राणायाम करुन घेतले. डॉ. महावीरसिंग चौहाण यांनी प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. प्रा. जितेंद्र मेटकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, सावित्रिबाई फुले माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, इंग्रजी मिडीयम स्कुलचे प्राचार्य श्री. चंद्रगुप्त मेहरे, प्रा. समशुद्दीन इनामदार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

