शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २१ जून २०२२
पारनेर तालुक्यात खरिप हंगाम धोक्यात, || पावसाअभावी शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट..!!
पारनेर : पारनेर तालुक्यात रोहीणी नक्षत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊल झाल्याने बळीराजाने मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी केली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासुन पाऊस गायब झाल्याने नुकत्याच कोंब आलेल्या पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. काही पिके जळू लागली आहेत तर काही शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
चालू वर्षी कडक उन्हाळ्यात तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. जून महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला होता. सुरवात चांगली म्हणून तालुक्यातील शेतकर्यांनी चांगले भांडवल गुंतवत शेतात वाटाणा, मुग, तुर, उडीद, बाजरी या पिकांची शेतात पेरणी केली आहे. मान्सून पुर्व पाऊस चालू झाला आसल्याने ही सर्व पिके जोमात उगवून आली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. नुकतेच अंकुर फुटून बार आलेल्या मोडांना आताचे ऊनही सहन होईनाशे झाले आहे. पेरणी नंतर पाऊसच झाला नसल्यामुळे जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे.
चालू वर्षी मान्सूनचे आगमन लांबले असून पाऊस लांबल्याने मुग पिंक काळे पडू लागले आहेत. वाटाणा सोयाबीन पिकावरही या लांबलेल्या पावसचे वाईट परिणाम जाणवू लागले आहेत. पिक वाढीच्या काळात पाऊस पाण्याचा ताण बसला तर पुढे उत्पन्नावर याचा खुप मोठा परिणाम होतो. बहुतेक गावांमध्ये अद्याप विहरी, बोअरवेल, ओढ्या, नाल्यांना पुरेसे पाणी आले नाही. त्यामुळे नगदी पिका बरोबरच भाजीपाला पिकेही धोक्यात आली आहेत. हीच अवस्था मेथी, कोंथबीर, पालक यांचीही झाली आहे. थोड्याफार प्रमाणात हालक्या सरी जरी आल्या तरी पिकांना जीवदान मिळेल या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
पाऊस लांबल्यामुळे जसे पिकांचे नुकसान होत आहे तसेच वन्य प्राण्यांचीही चारा पाणासाठी वनवन चालू आहे ती अद्याप थांबलेली नाही. पाळीव प्राण्यांसाठी ही पुरेशा प्रमाणात चारा पाण्याची सोय आजुन तरी झालेली नाही. अनखी काही दिवस पाऊस झाला नाही तर काही भागात मुग यासह इतर पिके पेरलेल्या शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
पाऊस होऊनही पाण्याच्या झळा.....
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीसरातील भोयरे गांगर्डा, कडूस, पाडळी रांजणगाव, पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, जातेगाव आदी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र पुन्हा पावसाने पाठ फिरवली असून या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत. जनावरांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

