रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात जागतिक योग दिन संपन्न.
इंदापूर- भिगवण प्रतिनिधी:
दि २१ रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात ८४६ विद्यार्थी व ३२ शिक्षक सहभागी झाले.विद्यालयाचे प्राचार्य बी आर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिन विद्यालयात संपन्न झाला.
विद्यालयाच्या पर्यवेक्षीका रोहिणी कुबेर यांनी देखील योगदिनात सहभाग घेतला.
विद्यालयातील आर एस पी पथकाने यावेळी योग प्रात्यक्षिके केली. महिला शिक्षिकादेखील कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या.
विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शहाजी वाघमारे,राजाराम जरांडे यांनी ताडासन, हलासन, त्रिकोणासन अशी आसने व प्राणायाम करून घेतले तसेच प्रार्थना,ध्यान, संकल्प , शांतिपाठ घेण्यात आला.

